जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- ग्रीन सिटी जळगाव फाउंडेशन व नवजीवन प्लस यांच्या संयुक्त विद्यमानाने जळगाव शहरातील दुभाजकांमध्ये बोगनवेल लावण्याचा कार्यक्रमाची सुरुवात जळगाव शहराच्या महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते झाला. प्रारंभी कोमल कांकरिया यांनी महापौरांचे स्वागत केले. व इतर मान्यवरांचे अनिल कांकरिया यांनी स्वागत केले.जळगाव शहरातील सर्व दुभाजक यामध्ये ग्रीन सिटी जळगाव फाउंडेशन हे रंगीबेरंगी बोगनवेल लावून जळगाव शहर हे सुशोभित करणार आहे, असे आश्वासन विजय वाणी यांनी दिले. याप्रसंगी सुरेश ललवाणी, राम जोशी, देवदत्त गोखले ,गायत्री पाटील, राजश्री जगताप, व मराठी प्रतिष्ठानचे जमील देशपांडे दीपक धांडे,मनीषा पाटील वसंत पाटील व ग्रीन सिटी जळगाव फाउंडेशनचे अध्यक्ष विजय वाणी उपस्थित होते.
ग्रीन सिटी फाऊंडेशनतर्फे दुभाजकांत बोगनवेल लावण्याचा कार्यक्रम
RELATED ARTICLES