Monday, February 9, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे दीर्घ आजाराने निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे दीर्घ आजाराने निधन

मुंबई/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे वयाच्या 81व्यां वर्षी अल्जायमर या दीर्घ आजारामुळे निधन झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा अजिंक्य देव याने त्यांच्या या आजाराविषयी सोशल मीडियावर माहिती दिली होती.मागील वर्षी त्यांचे पती रमेश देव यांचे मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.आता सीमा देव यांच्या निधनानंतर मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली असून त्यांची उणीव मराठी प्रेक्षकवर्गाला नेहमीच जाणवत राहील. त्यांनी 1961 साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या “जगाच्या पाठीवर” या चित्रपटाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी “सुवासिनी”, “आनंद” असे त्यांचे चित्रपट सुपरहिट झाले. आज त्यांच्या या जाण्याने मराठी प्रेक्षक त्यांना मुकला असून, मराठी चित्रपट सृष्टीत प्रेक्षकांना त्यांची उणीव नेहमीच जाणवेल.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या