Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद जिल्हा परिषद उर्दू मुलींची शाळा नंबर 2 येथे मुलींना गणवेश वाटप

नशिराबाद जिल्हा परिषद उर्दू मुलींची शाळा नंबर 2 येथे मुलींना गणवेश वाटप

नशिराबाद/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- दि.23 ऑगस्ट बुधवार रोजी नशिराबाद येथील जिल्हा परिषद उर्दू मुलींची शाळा नंबर 2 येथील विद्यार्थी मुलींना गणवेश वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या गणवेश कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूल चे कार्याध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष स्व.श्री.नारायण पाटील फाऊंडेशन, व नशिराबाद दूध उत्पादक सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री.योगेश नारायण पाटील (पिंटू शेठ ) यांना आमंत्रित केले गेले होते. व त्यांच्याच हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. गणवेश वाटप कार्यक्रमासाठी अमजद खान, दीपक सोनवणे, आनंदा भाऊ रंधे, सांडू पैलवान, गज्जू शेख.हजर होते. तसेच कार्यक्रमाला शिक्षक वृंद व विद्यार्थिनी बहु संख्येने हजर होते.कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापक यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या