जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जिल्हयांत टोळीने गुन्हे करणारे व्यक्तींविरुध्द मुंबई पोलीस .क. ५५ प्रमाणे हद्दपार प्रस्ताव पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे आल्यानंतर प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून चौकशीकरुन जिल्हयांतून हद्दपार करण्याचे किंवा वारंवार गुन्हे करण्याच्या सवयी आहेत, असे चौकशीत निष्पन्न झाल्याने जळगांव जिल्ह्यातून एकूण पाच गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले असून त्यामध्ये एक महिलेचा समावेश आहे. सदरची गॅंग हद्दपार झाल्यामुळे गुन्ह्यांना लगाम लागणार आहे.
जळगाव एमआयडीसी पोलिसांकडील हद्दपार प्रस्ताव क्र. ०१ / २०२३ प्रमाणे समोरील प्रमुख १) भावना जवाहरलाल लोढा वय ३८ रा. अयोध्यानगर, जळगाव टोळी प्रमुख (२) अनिल रमेश चौधरी वय ४०, टोळी सदस्य, रा. अयोध्यानगर, जळगाव, (३) सैय्यद सजील सैय्यद हारुन वय २६ टोळी सदस्य रा. मास्टर कॉलनी, मेहरुण, जळगाव, (४) सैय्यद आमीन सैय्यद फारुख पटवे ऊर्फ बुलेट वय २६ रा. मास्टर कॉलनी, मेहरुण, जळगाव, (५) सैय्यद अराफत सैय्यद फारुख वय ३४ रा.तांबापुरा यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाणे, जामनेर पोलीस ठाणे, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे,पहूर पोलीस ठाणे, चाळीसगाव शहर पोलीस ठाणे नशिराबाद पोलीस ठाणे आणि चाळीसगाव रेल्वे पोलीस स्टेशनला एकूण ०८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर सामनेवाले यांनी सदरचे गुन्हे टोळीने केलेले आहेत. हद्दपार प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव उपविभाग यांनी केलेली आहे. या गुन्हेगारांनी टोळीने राहून जळगाव शहरात जिल्हयात ठिकठिकाणी दहशत पसरवितात. या टोळीची नागरिकांमध्ये भिती निर्माण होऊन नागरिकांचे जिवीतास आणि जंगम मालमत्तेस धोका निर्माण झालेला आहे. त्यांना जळगाव जिल्हयांत शांतता ठेवण्याबाबत त्यांचे विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा झालेली नाही. त्यांचे विरुध्द गुन्हे दाखल आहे. त्यांच्यामुळे जनतेच्या जिवीताला, मालमत्तेस मोठा धोका निर्माण झालेला आहे असे चौकशीत निष्पन्न झालेले आहे. सदरचा हद्दपार प्रस्ताव हा एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहायक फौजदार अतुल वंजारी,सचिन पाटील, योगेश बारी, इमरान सैय्यद, साईनाथ मुंडे, जमील शेख, निलोफर सैय्यद, इम्तियाज खान यांनी सदरचा प्रस्ताव तयार करुन पोलीस अधीक्षक यांच्याकडेस सादर केला होता. एम.राजकुमार, पोलीस अधीक्षक जळगाव यांनी प्रस्तावाचे चौकशीअंती त्यांना वर्षाकरीता जळगाव जिल्हयांच्या हद्दीतून हद्दपार आदेश पारित केलेले आहे. हद्दपार प्रस्तावाचे कामकाज पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी व त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, सुनिल पंडीत दामोदरे यांनी पाहिले आहे.

