Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावभोरटेकच्या वृद्ध शेतकऱ्याने तापी नदीवरून उडी मारून जीवनयात्रा संपविली..

भोरटेकच्या वृद्ध शेतकऱ्याने तापी नदीवरून उडी मारून जीवनयात्रा संपविली..

शिरपूर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- धुळे जिल्ह्यातही आत्महत्याच्या घटनेत वाढ झाली आहे. सावळदे (ता. शिरपूर) येथील पुलावरून तापी नदीत उडी टाकत वृद्ध शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना २९ ऑगस्ह बाहेर काढण्यात आला.पुलावरून तापी नदीत उडी टाकताना वृद्धाला महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी पाहिले. त्यांनी आरडाओरडाही केला. मात्र त्याच्यापर्यंत पोचण्याच्या आतच वृद्धाने नदीत उडी टाकली. मंगळवारी दुपारी तीनला ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांना सूचित करण्यात आले. त्यांनी सावळदे येथील मच्छीमारांच्या मदतीने नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली.दरम्यान, पुलावर वृद्धाचे मतदान ओळखपत्र आणि टोपी आढळली. त्यावरून मृत शेतकरी चिंधू दामू चौधरी (वय ७३) आहे.ते भोरटेक (ता. शिरपूर) येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू ठेवल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. पोलिसांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. हवालदार प्रमोद ईशी तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या