Monday, February 9, 2026
police dakshta logo
Homeजळगावदुचाकी जवळ उभ्या असलेल्या दुचाकीस्वार महिलेला टेम्पोची जोरदार धडक

दुचाकी जवळ उभ्या असलेल्या दुचाकीस्वार महिलेला टेम्पोची जोरदार धडक

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मंगळवारी 29 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिला जखमी झाल्याची घटना सिंधी कॉलनी येथील डायमंड हॉल जवळ घडली. बुधवारी 30 ऑगस्ट रोजी रात्री 8 वा. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्नेहा परेश पुराणिक (वय-28) रा. गणेश नगर, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला असून, मंगळवार 29 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 वा. सुमारास स्नेहा पुराणिक व त्यांची आई पुजा तलरेजा या आपल्या दुचाकी (MH-19 D 2585) ने शहरातील सिंधी कॉलनी परिसरात कामानिमित्त डायमंड हॉल येथे आल्या होत्या. तेथे पुजा तलरेजा ह्या त्यांच्या दुचाकीजवळ उभ्या असतांना समोरून दुध वाटप करणारी चारचाकी क्रमांक (MH -05 R 7580) ने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत पुजा तलरेजा या किरकोळ दुखापत झाली.त्याचबरोबर अपघातामुळे वाहनाचेही नुकसान झाले. याप्रकरणी बुधवारी 30 ऑगस्ट रोजी रात्री 8 वा. स्नेहा पुरानिक यांनी एमआयडीसी पोलीसात समोरील वाहन चालकाविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून चारचाकी वाहन चालक पांडूरंग सुकदेव मेढे रा. पिंप्राळा हुडको, जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पढील तपास सहाय्यक राजेंद्र उगले करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या