Monday, February 9, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यापाचोऱ्यात स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; तीन तलवार जप्त; संशयित आरोपीस अटक

पाचोऱ्यात स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; तीन तलवार जप्त; संशयित आरोपीस अटक

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- पाचोरा तालुक्यातील मोहाडी गावात बुधवारी 30 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता येथे राहणाऱ्या हर्षल विनोद राजपूत (वय २०, रा. मोहाडी ता.पाचोरा) या तरुणाच्या घरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) छापा टाकून बेकायदेशीरित्या लपवून ठेवलेल्या तीन तलवारी हस्तगत केल्या आहे. याच्यावर पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, अटक केलेल्या संशयित आरोपी हर्षल विनोद राजपूत (वय २०, रा. मोहाडी ता.पाचोरा) याने त्याच्या घरात तीन तलवारी प्लास्टिक पिशवीमध्ये गुंडाळून लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या गोपनीय माहिती दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथकाला तत्काळ कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. बुधवारी 30 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता पथकातील सपोनि निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, गणेश चौबे, सहाय्यक फौजदार अनिल जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल नंदलाल पाटील, महेश महाजन, गोरख बागुल, संदीप सावळे, प्रीतम पाटील, जयंत चौधरी, अनिल देशमुख, पोलीस नाईक भगवान पाटील, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, किरण चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल उमेश गोसावी, लोकेश माळी, चालक पोलीस नाईक अशोक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल प्रमुख ठाकूर, मोतीलाल चौधरी या पथकाने कारवाई करत संशयिताला अटक केली आहे. त्यानुसार पथकाने कारवाई करत 10 हजार रुपये किंमतीच्या तीन तलवारी हस्तगत केले आहे. व पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या