Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावयावल महिला मंडळ अधिकारी हल्ला प्रकरण; जळगाव तालुका तलाठी संघातर्फे तहसीलदार यांना...

यावल महिला मंडळ अधिकारी हल्ला प्रकरण; जळगाव तालुका तलाठी संघातर्फे तहसीलदार यांना निवेदन 

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:– यावल तालुक्यात अवैध गौण खनिज विरुद्ध कारवाई करत असताना महिला मंडळ अधिकारी बबिता चौधरी यांच्यावर वाळू वाहतूक दाराकडून धक्काबुक्की व मारहाण केल्याची अतिशय निंदनीय घटना घडली. या घटनेतील आरोपीस अद्यापही अटक झालेली नाही.दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी यासाठी जळगाव तालुका तलाठी संघातर्फे काम बंद ठेवून तहसीलदार जळगाव यांना निवेदन देण्यात आले.

जळगाव जिल्ह्यामध्ये अवैध गौणखनिज वाहतुक विरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असून या करिता सर्व तलाठी व मंडळ अधिकारी आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. अश्यातच काल दिनांक 31 ऑगस्ट रोजी यावल तालुक्यात अवैध गौण खनिज विरुद्ध कारवाई करत असताना महिला मंडळ अधिकारी बबिता चौधरी यांच्यावर वाळू वाहतूक दाराकडून धक्काबुक्की व मारहाण केल्याची अतिशय निंदनीय घटना घडली. या घटनेतील आरोपीस अद्यापही अटक झालेली नाही. या घटनेमुळे सर्व तलाठी वर्गात संतापाचे वातावरण असून या प्रकारामुळे अधिकारी व कर्मचारी वर्गात मानसिक खच्चीकरण होत असल्याची भावना निर्माण असल्याने या प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर अटक व्हावी यासाठी जळगाव तालुका तलाठी संघातर्फे काम बंद ठेवून त्यांनी आपला निषेध नोंदवला आहे. तसेच या प्रकारांवर कायम स्वरूपी उपाययोजना व्हावी व दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी असे निवेदन जळगाव तालुका तलाठी संघातर्फे तहसीलदार जळगाव यांना देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या