पुणे/ प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- राज्यात बलात्काराच्या घटनेत वाढ होत चालली आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरात समोर आलेली आहे.बारामती शहरातील एमआयडीसीमध्ये एका तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवत त्यानंतर एका लॉजवर घेऊन घेऊन जात तिच्यावर बलात्कार करण्यात आलेला आहे. आरोपीने तिला मारहाण देखील केलेली असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.उपलब्ध माहितीनुसार , रोहित शिवाजी इंगवले ( राहणार शिवाजीनगर फलटण जिल्हा सातारा ) असे आरोपी व्यक्तीचे नाव आहे. पीडित युवतीने 19 तारखेला हा सर्व प्रकार झाल्याचे सांगितलेले आहे. तरुणीच्या म्हणण्यानुसार रोहित याने एमआयडीसी परिसरात आपल्याला गाठले आणि जबरदस्तीने दुचाकीवर बसवत लॉजवर घेऊन जात आपल्यावर अत्याचार केलेला आहे. त्याच्या बॅगमधील काहीतरी वस्तू त्याच्या हातात होत्या आणि त्याने आपल्याला मारहाण केली असे देखील तिने म्हटलेले आहे.
एका तरुणाने जबरदस्ती बारामतीतून तरुणीला दुचाकीवर बसवत लॉजवर नेलं अन…
RELATED ARTICLES

