Thursday, November 21, 2024
police dakshta logo
Homeक्राईम१५ वर्षीय मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

१५ वर्षीय मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव सिंधी कॉलनी परिसर येथून अल्पवयीन १५ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरात राहणारी अल्पवयीन मुलगी ही तिच्या कुटुंबासह तांबापुरा परिसरात वास्तव्यास आहे. घटना घडली त्या दिवशी दि.६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता अल्पवयीन मुलगी कामानिमित्त सिंधी कॉलनी परिसरात गेली होती, ती अल्पवयीन मुलगी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पुन्हा घरी परतली नाही, सर्वत्र शोध घेतला असता मुलगी कोठेही मिळून न आल्याने, अखेर दोन दिवसानंतर शुक्रवारी अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अज्ञात व्यक्तीने काही तरी फूस लावून मुलीला पळवून नेत तिचे अपहरण केल्याचे मुलीच्या वडीलांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक रविंद्र गिरासे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या