अमरावती/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- अमरावतीमध्ये एका माथेफिरु तरुणाने आपल्या प्रेयसीच्या आईला व भावाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीच्या आईला व भावाला जिवंत जाळल्यानंतर या तरुणाने स्वत:ताही पेटवून घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे अमरावतीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
अमरावती येथील वरुड तालुक्यातील वंडली येथे रविवार रात्री 1 वाजेच्या दरम्यान ही थरारक घटना घडली. आरोपी आशिष ठाकरे (वय 25) वर्षेअसे या माथेफिरु तरुणाचे नाव आहे. लता सुरेशराव भोंडे (वय 45 वर्ष) आणि त्यांचा मुलगा प्रणय सुरेशराव भोंडे (वय 20 वर्षे) अशी जाळून खून करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी आशिष ठाकरेनेही या दोघांना जिवंत पेटविल्या नंतर स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तरुण आणि त्याची प्रेयसी एकत्र राहत होते. त्यांच्या कुटुंबाला व मुलीच्या कुटुंबीयांना हे मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी दोघेही दोघांनी वेगळे राहण्याचे ठरविले. व ते एकत्र राहू लागले. काही काळ लोटल्यावर या दोघांमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली,खटले उडू लागले. त्यांच्यामधील वाद वाढत गेल्याने तरुणीने तरुणासोबतचे संबंध तोडले व पुन्हा आपल्या घरी राहायला आली. प्रियकराशी भांडण झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून प्रेयसी आपल्या घरी आई आणि भावासोबत राहत होती. प्रेयसीला आपल्यासोबत पुन्हा घेऊन जाण्यासाठी प्रियकर सतत तगादा लाऊन सतत तिच्या घरी जात होता. तरुणीची आई आणि भाऊ पुन्हा तरुणीला तरुणासोबत पाठवण्यास तयार नव्हते. या कारणाने तरुणीची आई आणि भाऊ यांच्यासोबतही तरुणाचे भांडण झाले. प्रेयसीच्या आई व भावाने केलेल्या भांडणाचा राग मनात ठेऊन या तरुणाने असे कृत्य केल्याचे समोर आले आहे. प्रेयसी घरी नसताना हा तरुण तिच्या घरी गेला व त्याने तिच्या आईला आणि भावाला जिवंत जाळले. मात्र, नंतर आपण केलेल्या कृत्यामुळे भयभीत होऊन त्याने स्वत:लाही संपवून घेतले. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.