नाशिक/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आमदार सीमा हिरे यांच्या विधानसभा मतदारसंघात ‘महाविजय – २०२४ घर घर संपर्क अभियान’ कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.यावेळी,प्रथम भाजपा प्रदेशाध्यक्ष यांचे जलोषात स्वागत करण्यात आले.आगामी प्रत्येक लहान ते मोठ्या निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांसह सर्वांनीच भाजपाला मोठा विजय मिळवून देण्यासाठी दृढनिश्चय करावा असं आवाहन यावेळी उपस्थितांना केले.प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विक्रांत पाटील, आ.राहुल ढिकले, लक्ष्मण सावजी, प्रशांत जाधव, राजेंद्र गावित, नाना शिलेदार, महेश हिरे, दिनकर पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक येथे ‘महाविजय – २०२४ घर घर संपर्क अभियान’ कार्यक्रम उत्साहात
RELATED ARTICLES