अमळनेर /पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून दातृत्व दाखवत केलेल्या समाजपयोगी कार्याचे कौतुक होत आहे.शहरातील ढेकू व पिंपळे रोड तसेच आर. के. परिसरासाठी भूपेंद्र बाविस्कर यांनी स्वखर्चाने शवपेटी दान केली आहे. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या कुटुंबात एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाची अवहेलना होऊ नये म्हणून भूपेंद्र बाविस्कर यांनी आपल्या जन्मदिवसानिमित्त शवपेटी दान केली.त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, माजी, सहकार अधिकारी आर. एस. पाटील, डी. ए. धनगर, सावंत यांच्या हस्ते शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी बी. ए. पाटील, भिका गोसावी, जितेंद्र पवार, संजय पाटील, जितेंद्र पवार, ईश्वर पाटील, के. डी. बाविस्कर, राजन पाटील, दीपक चव्हाण, हर्षल चौधरी, संजय बाविस्कर, निवृत्ती भोगे, डी. ए. पवार, रवींद्र चौधरी, कुंदन पाटील, किशोर पाटील, निर्मल बडगुजर, बी. एस. पाटील, किरण शिसोदे, सतीश पाटील, राहुल चौधरी, अनिल बोरसे, कैलास बोरसे, सतीश गोसावी, दुसाने, कैलास पाटील, दीपक पाटील, समाधान धनगर, भूपेंद्र पाटील उपस्थित होते.