Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावअमळनेर तालुक्यातील दोन युवकांनी महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले; गुन्हा दाखल; जळगाव सबजेलला रवानगी..!

अमळनेर तालुक्यातील दोन युवकांनी महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले; गुन्हा दाखल; जळगाव सबजेलला रवानगी..!

अमळनेर/धवल वाघुळदे/ पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- थोर महापुरुषांबद्दल आदर बाळगणे,त्यांच्या विचारांवर चालणे हे महत्वाचे आहे. मात्र अनेक ठिकाणी महापुरुषांचा अवमान केल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतात.

महापुरुषाबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल अमळनेर तालुक्यातील जानवे व रणाईचे येथील दोघांवर अनुसूचित जाती- जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांना अमळनेर न्यायालयात उभे केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्यांची जळगाव सब जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इन्स्ट्राग्राम वर भारतरत्न ,संविधानकर्तेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरले म्हणून समाधान मैराळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जानवे येथील कल्पेश पाटील आणि रणाईचे येथील हरीश बोरसे या दोघांविरुद्ध अँट्रोसिटी कायद्यान्वयेगुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास डीवायएसपी सुनील नंदवाळकर हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या