Monday, February 9, 2026
police dakshta logo
Homeक्राईमअवैध मटका,सट्टा क्लबवर छापा; ४ आरोपी ताब्यात १ फरार; गुन्हा दाखल

अवैध मटका,सट्टा क्लबवर छापा; ४ आरोपी ताब्यात १ फरार; गुन्हा दाखल

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव पोलिसांनीअवैधरित्या सुरू असलेल्या मटका, व सट्टा क्लबवर छापा टाकत ४ जणांवर कारवाई करण्यात आली. शहरातील राजकमल टॉकीज आणि सुभाष डेअरीच्या पाठीमागे या दोन ठिकाणी सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावित यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत एकूण ३ हजार ३९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार जळगाव शहरात सुभाष डेअरी आणि शनीपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दील राजकमल टॉकीज परिसरामध्ये अवैधरित्या मटका व सट्टा क्लब सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावित यांनी पथक नेमून पथकाला तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार मंगळवारी दि.७ नोव्हेंबर रोजी या दोन्ही ठिकाणी छापा टाकत संशयित आरोपी सचिन आनंदा जाधव, संजय भाऊलाल चौधरी आणि सखाराम भटू चौधरी या तिघांना ताब्यात घेतले असून त्यातील राजू पाटील हा आरोपी फरार झाला आहे. पोलीसांनी केलेल्या या करवाईत एकूण ३ हजार ३९० रुपये किमतीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे, नाना तवर, पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र बोदवडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील, बालाजी बारी, मनोहर वानखेडे यांनी कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या