जळगाव/ पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुला-मुलींचे निरीक्षणगृह/बालगृह जळगांव या संस्थेची सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्देशानुसार १९ जानेवारी रोजी साडेचार वाजता संस्थेच्या आवारात जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली आहे.
सभेस संस्थेचे कार्यकारिणी सदस्य तसेच आजीवन सदस्य यांना सभेस वेळेत हजर राहावे असे आवाहन करण्यात आहे.
असे मानद सचिव (प्रभारी) जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुला-मुलीचे निरीक्षणगृह/बालगृह जळगांव यांनी अधिकृत पत्रकानव्ये कळविले आहे.