जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक पदी एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली असून एम. राजकुमार यांची बदली झाली आहे.
या वर्षी 2024 च्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काही वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात जळगावचे पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांची बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही महिन्यांतच त्यांची बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, त्यांच्या जागी एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
एम.सी.व्ही. महेश्वर रेड्डी यांची जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सहसचिव व्यंकटेश भट यांनी बुधवारी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी दिलेल्या आदेशानुसार कळविले आहे. तर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची सोलापूर शहर पोलीस आयुक्त पदी पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे.
याचबरोबर चाळीसगाव पोलीस अधिकारी रमेश चोपडे यांची बदली पुणे येथील ग्रामीण भागातील अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांच्या जागी आता मुंबई सायबर पोलीस अधीक्षका कविता नेरकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले आहे.

