Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याचांदवडच्या वेदांता इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्नेहसंमेलन संपन्न

चांदवडच्या वेदांता इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्नेहसंमेलन संपन्न

चांदवड/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- दि. ३१ जानेवारी बुधवार रोजी वेदांता इंग्लिश मिडीयम स्कूलचे स्नेहसंमेलन चांदवड शहरातील राधाकृष्ण लॉन्स चांदवड येथे संपन्न झाले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजय पाडवी,प्रा. उदय वायकोळे व पत्रकार धनंजय पाटील हे उपस्थित होते.

यावेळी वेदांता संस्थेचे संस्थापक श्री विजय जाधव व संस्थेचे संचालक ऍड. बाळकृष्ण कावळे यांनी सांगितले की संस्थेने ज्युनिअर केजी पासूनच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना छान व्यासपीठ उपलब्ध केले आहे. विद्यार्थ्यांमधील विविध प्रकारचे कला-गुणांना अभिव्यक्त होतांना पाहणे हे एक मंतारलेले क्षण असल्याचा भास क्षणोक्षणी होत होता असे मत संजय पाडवी यांनी व्यक्त केले.

स्नेहसंमेलनाचे शुभारंभ सेवानिवृत्त सैनिक सौ.भारती व श्री.शिवाजी मैदुने व प्रगतीशील शेतकरी सौ. माधुरी व श्री. रामनाथ शेंडगे या दाम्पत्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्या सौ. मोनाली सिसोदिया , सोनाली आहेर , मोनाली शिंपी इ. शिक्षकवृंद उपस्थित होते.स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात आनंददायी वातावरणात संपन्न झाले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या