स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफचे पथकाकडून युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू….
नवी दिल्ली/ वृत्तसेवा/पोलीस दक्षता लाईव्ह:- उत्तराखंड येथील ऋषिकेश -बद्रीनाथ महामार्गावर ड्रायव्हरचा टेम्पो ट्रॅव्हलर वाहनावरील ताबा सुटल्याने भाविकांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. बद्रीनाथ महामार्गावरील रुद्रप्रयाग येथे हा अपघात झाला आहे. या अपघातात सात जण जखमी झाल्याची माहिती मिळाली असून १० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून बचाव कार्य सुरू आहे.
ट्रॅव्हलर नदीत कोसळल्याची बचाव पथकाला माहिती मिळताच पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, मात्र नदीचा प्रवाह वेगात असल्याने रेस्क्यू ऑपरेशन करण्यात अनेक अडचणी येत आहेत. स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफचे पथकाकडून युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.