Saturday, July 12, 2025
police dakshta logo
HomeUncategorizedब्रेकिंग : मजुरांनी भरला ट्रक उलटला 15 जण जखमी

ब्रेकिंग : मजुरांनी भरला ट्रक उलटला 15 जण जखमी

मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी गावाजवळ मजूर घेऊन जात असलेला आयशर ट्रक उलटून झालेल्या अपघातात सुमारे 15 जण जखमी झाल्याची माहिती आहे

या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की एका आयशर ट्रक मधून मजूर रावेरच्या दिशेने जात होते बेलसवाडी गावाजवळ अचानक ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा ट्रक उलटून पडला यात सुमारे 15 स्त्रीपुरुष जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, विशेष बाब म्हणजे जखमी मध्ये काही बालकांचा देखील समावेश आहे दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले शेवटचे वृत्त हाती ला आले तेव्हा जेसीबीच्या मदतीने आयशर ट्रक हलवण्यात आला होता तर या संदर्भात पोलीस स्थानकात तक्रार नोंदवायचे काम सुरू होते

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या