अमळनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- अमळनेर शहरात पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे जळोद गावाजवळ दोन व्यक्तींना बेकायदेशीर गांजा विक्रीसह पकडले आहे. पोलीसांनी काळ्या रंगाच्या बजाज प्लॅटीना मोटरसायकल क्रमांक एम. एच. १९-सी. टी. ४८४५वर येणाऱ्या या दोघांवर छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले.
पोलीसांनी त्यांच्याकडून १५ किलो ४० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून, त्यातील १०० ग्रॅमच्या तीन पाकीटांची नमुना म्हणून घेतली गेली आहे. या गांजाची किंमत सुमारे ३,००,००० रुपये आहे. तसेच, मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे ज्याची किंमत ४०,००० रुपये आहे.
अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकाचं नाव महेश कैलास पाटील असून तो भडगाव येथील रहिवासी आहे. त्याचा साथीदार नितीन शरद गौड पाचोराचा रहिवासी आहे. दोघांविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली असून, पुढील तपास सपोनि सुनिल लोखंडे करत आहेत.

