Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeजळगावडोंबिवलीतील खान्देश कन्याचे खूप खूप अभिनंदन...!

डोंबिवलीतील खान्देश कन्याचे खूप खूप अभिनंदन…!

डोंबिवली | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- डोंबिवली येथील रहिवासी ललित प्रभाकर नेमाडे यांची मुलगी तन्वी नेमाडे आणि भूषण प्रभाकर नेमाडे यांची मुलगी भूमिका नेमाडे यांना “रूल द रोप्स” साठी पदके मिळाल्याबद्दल २७ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान जपानमधील कावासाकी येथे झालेल्या जागतिक जंप रोप चॅम्पियनशिपच्या आंतरराष्ट्रीय खुल्या स्पर्धेत तन्वीने दोन रौप्य पदके आणि एक कांस्य पदक जिंकले आणि भूमिकाने एक सुवर्णपदक जिंकले. त्यांनी १६-१८ वयोगटात भाग घेतला आणि सिंगल रोप स्पीड रिले मिश्र संघ आणि इतर स्पर्धांमध्ये पदके मिळवली. जपानमधील कावासाकी येथे आयजेआरयूने हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांनी आधीच अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पदके जिंकलेली आहेत. त्यांच्या या यशाबद्दल जळगाव येथील कलावंत व जेष्ठ पत्रकार तुषार वाघुळदे ,सौ.नेहा वाघुळदे आदींनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या