पिंपरी | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आज दि. २ ऑगस्ट २०२५:संपूर्ण खान्देशातील श्रद्धास्थान असलेल्या कानबाई मातेच्या उत्सवाचे आयोजन यंदा दुसऱ्या वर्षी पिंपरी चिंचवड शहरात करण्यात आले आहे. ‘भक्त खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२५’ या नावाने हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे.उत्सवाची सुरुवात शनिवार, दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता समा पूजन (गृह दर्शन) ने होणार आहे. हा कार्यक्रम तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी, विजलिनगर, चिंचवड, पुणे येथे पार पडणार आहे. यानंतर “किरतूनी भाजी, कणय्यानी भाकर” हा खास खान्देशी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे, ज्याचे सादरकर्ते असतील श्री. अशोक बनासे व सहकारी.
रविवारी, ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भव्य मिरवणूक व स्थापना करण्यात येणार आहे. मिरवणूक मार्ग: तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी ते आहेर गार्डन, वाल्हेकवाडी. यात गोल्डन बँड (शिरपूर), राधाकृष्ण बँड (कसरे) यांचे संगीत, महिला पारंपरिक वेषभूषा, पुरुषांची पारंपरिक पोशाखात उपस्थिती विशेष आकर्षण ठरणार आहे.कार्यक्रमात संगीतमय गायन सेवा म्हणून सागर देशमुख, दिलीप वाशींग, कुणाल महाराज व दिनेश वाशींग यांचे सादरीकरण होणार आहे. याशिवाय कानबाई फ्रेंड्स सर्कल शिरपूर, धुळे, पुणे यांच्या सहकार्याने कार्यक्रमाची रंगत वाढणार आहे.सोमवार, ४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता विसर्जन मिरवणूक आहेर गार्डन ते जाधव घाट, रावते या मार्गावरून काढण्यात येणार आहे. यामध्ये गोल्डन बँड (शिरपूर) हे प्रमुख आकर्षण असणार आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाचे निमंत्रक श्री. धीरज ठाकुर असून संयोजनाची धुरा मा. श्री. नामदेवराव ढाके (सभापती तथा सर्वसामान्य विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका व जिल्हा नियोजन समिती सदस्य, पुणे) यांनी सांभाळली आहे.
उत्सवाचे आयोजन सर्व खान्देश समाज, बंधु भगिनी, पिंपरी चिंचवड शहर, पुणे परिसर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

