Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमगावठी कट्टा घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणास अटक

गावठी कट्टा घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणास अटक

रावेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- रावेर तालुक्यातील रणगाव येथे गावठी कट्टा कमरेला लावून गावात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने रंगेहात पकडले. संशयिताच्या ताब्यातून ४० हजार रुपये किमतीचा कट्टा जप्त करण्यात आला आहे.

किरण ब्रिजलाल कोळी (रा. रणगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. ९ ऑगस्ट रोजी एलसीबीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना संशयिताबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथक रणगाव येथे रवाना झाले. सापळा रचून संशयिताला ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीत त्याच्या कमरेला लावलेला गावठी कट्टा आढळून आला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, पोलिस नाईक विकास सातदिवे, कॉन्स्टेबल बबन पाटील, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे, मयूर निकम आणि चालक हवालदार भारत पाटील यांच्या पथकाने केली. पुढील तपास सावदा पोलिसांकडे सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या