Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeअमळनेरअल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघे ताब्यात

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघे ताब्यात

अमळनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- अमळनेर शहरात चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरी अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. हा प्रकार मंगळवार, १२ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११ वाजता घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अमळनेर शहरातील एका भागात आपल्या कुटुंबासह राहत होती. रात्री आरोपी अन्नू नारायण साळुंखे (पारधी, रा. अमळनेर) याने मुलीला फोन करून भेटण्यास बोलावले. त्यानंतर दुचाकीवर बसवून चोपडा रोडवरील एका मंदिराच्या परिसरातील मोकळ्या जागेत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या गुन्ह्यात गण्या उर्फ गणेश नाना साळुंखे (पारधी, रा. अमळनेर) याने आरोपीस सहकार्य केले.

घरी परतल्यानंतर मुलीने नातेवाईकांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी तातडीने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेत दोघांविरोधात तक्रार दाखल केली. फिर्यादीवरून बुधवारी, १३ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता गुन्हा नोंदवून पोलिसांनी अन्नू साळुंखे आणि गण्या साळुंखे यांना अटक केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या