Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमयावल-चोपडा महामार्गावर ४ किलो गांजाची तस्करी उघड ; तिघे जेरबंद

यावल-चोपडा महामार्गावर ४ किलो गांजाची तस्करी उघड ; तिघे जेरबंद

NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

यावल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- यावल पोलीस स्टेशन हद्दीत गांजाची अवैध वाहतूक करताना पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत तिघा आरोपींना अटक करून चार किलो गांजा व एक स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई २५ जून रोजी गुप्त माहितीच्या आधारे यावल-चोपडा महामार्गावरील फॉरेस्ट कॉलनी परिसरात करण्यात आली. मा.पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत १) युसुफ शहा गुलजार शहा (५५, रा. मुस्लिम कॉलनी, ताज हॉटेलजवळ, खडका रोड, भुसावळ), २) युनूस सुलतान शेख (५१, रा. गरीब नवाज मशीदजवळ, खडका रोड, भुसावळ, मूळ रा. सुरत, गुजरात), ३) भानसिंग पुट्ट्या बारेला (रा. वाघझिरा, ता. यावल) या आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तपासात उघड झाले की, आरोपी युसुफ शहा व युनूस शेख यांनी भानसिंग बारेला याच्याकडून १५ हजार रुपयांत गांजा विकत घेऊन तो भुसावळ येथे विक्रीसाठी नेत होते. त्यांच्याकडून ४ किलो गांजा तसेच एक स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी यावल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना २६ ऑगस्ट रोजी यावल न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली.

सदर कारवाईत स.पो.नि. अजयकुमार वाढवे, पो.उ.नि. अनिल महाजन, स.फौ. विजय पाचपोळे, पो.हे.कॉ. रोहिल गणेश, पो.ना. वसीम तडवी, पो.ना. अमित तडवी, पो.हे.कॉ. आर्षद गवळी, पो.हे.कॉ. सागर कोळी व पो.हवा. ज्ञानेश्वर सपकाळे यांनी सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास स.पो.नि. अजयकुमार वाढवे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या