Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeजळगावभव्य सायक्लोथॉन रॅलीचे जळगावात यशस्वी आयोजन

भव्य सायक्लोथॉन रॅलीचे जळगावात यशस्वी आयोजन

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भारत सरकारच्या क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार ‘फिट इंडिया’ मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी भव्य सायक्लोथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले.

सदर रॅली पोलीस मुख्यालय, जळगाव येथून सुरू होऊन कानळदा रोड मार्गे परत पोलीस मुख्यालय येथे संपन्न झाली. तब्बल २५ कि.मी. अंतर असलेल्या या रॅलीत मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, तसेच जळगाव सायकलिस्ट ग्रुपचे सदस्य, विविध पोलीस अधिकारी/अंमलदार आणि शहरातील नागरिक अशा एकूण २०० ते २५० जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

रॅलीदरम्यान “फिटनेस की डोस, आधा घंटा रोज” हा महत्त्वपूर्ण संदेश जळगावकरांना देण्यात आला.

या सायक्लोथॉन रॅलीचे संपूर्ण नियोजन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडले. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पवन देसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, पोलीस मुख्यालयाचे रा. पो. निरीक्षक श्री. प्रशांत सुगरवार आणि AHTU च्या सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता नारखेडे यांनी रॅलीच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या