Wednesday, February 11, 2026
police dakshta logo
Homeक्राईमबनावट देशी दारूचा कारखाना उध्वस्त ; ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

बनावट देशी दारूचा कारखाना उध्वस्त ; ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

पारोळा | प्रतिनिधी । पोलीस दक्षता लाईव्ह :- पारोळा पोलीस ठाणे हद्दीत अवैधरीत्या सुरू असलेल्या बनावट देशी दारूच्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकत तब्बल ₹40 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिस निरीक्षक सचिन सानप यांना मिळालेल्या माहितीनुसार बहादरपूर गावाजवळील बोरी नदीच्या किनाऱ्यावर लोखंडी पत्र्याच्या शेडमध्ये “टँगो पंच” या नावाने बनावट देशी दारूचा अवैध कारखाना सुरू असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक (चाळीसगाव) कविता नेरकर पवार यांच्या सूचनेनुसार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई राबविण्यात आली.

पोलिस पथक व दोन शासकीय पंच यांच्या उपस्थितीत छापेमारीदरम्यान तयार तसेच तयार होण्याच्या प्रक्रियेत असलेली दारू, कच्चा माल, यंत्रसामग्री, वाहने आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. यात 3100 सीलबंद बाटल्या (₹1.24 लाख), 700 विक्रीपूर्व बाटल्या (₹28,000), 800 लिटर स्पिरीट (₹3.55 लाख), 1500 लिटर तयार दारू (₹3 लाख), RO व CNC मशिन्स (प्रत्येकी ₹5 लाख), पाणी लिफ्टिंग मशीन, इलेक्ट्रिक स्टॅबिलायझर, 30 हजार बुच, 61,200 रिकाम्या बाटल्या (₹6.12 लाख), विविध टाक्या, मिक्सर, स्टार्टर्स, बोलेरो मालवाहू वाहन (₹5 लाख), स्विफ्ट डिझायर कार (₹5 लाख) तसेच लोखंडी शेड (₹5 लाख) असा एकूण ₹40,33,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक अमोल दुकळे, पोलीस हवालदार महेश पाटील, शरद पाटील, प्रविण पाटील, अनिल राठोड, अजय बाविस्कर, आकाश माळी, विजय पाटील, शेखर साळुंखे तसेच चालक पोह. संजय पाटील व वेलचंद पवार यांच्या संयुक्त पथकाने केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या