Friday, October 30, 2026
police dakshta logo
Homeजळगावछत्रपती राजे संभाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रथम दिवस विद्यार्थी स्वागत समारंभ उत्साहात साजरा

छत्रपती राजे संभाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रथम दिवस विद्यार्थी स्वागत समारंभ उत्साहात साजरा

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव येथील छत्रपती राजे संभाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील प्रथम दिवस स्वागत समारंभ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. आर. व्ही. पाटील उपस्थित होते. तसेच नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य दुर्गेश परदेशी उपप्राचार्य डॉ पी. एन. पाटील, समन्वयक दीपक बारी व शाहू आयटीआयचे प्रा. परमेश्वर महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविन्त पाटील यांनी महाविद्यालयाचे प्रास्ताविक सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्षीय भाषणातून प्रा. आर. व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत शिक्षणाचे महत्त्व आणि शिक्षक म्हणून असलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. याप्रसंगी प्रा. डॉ. विश्वनाथ महाजन यांनी बीएड अभ्यासक्रमाची माहिती देऊन मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ. माधुरी पाटील यांनी केले. प्राध्यापकांचा परिचय व आभार प्रदर्शन द्वितीय वर्षातील विद्यार्थी-शिक्षिका वृषाली साळुंके यांनी केले.
द्वितीय वर्षाच्या विद्यार्थी शिक्षकाने महाविद्यालयाची इमारतीची प्रतिकृती दिली भेट.
द्वितीय वर्षातील विद्यार्थी शिक्षक दिनेश संजय पाटील व मयुरी संजय पाटील या विद्यार्थी शिक्षकांनी शैक्षणिक साधन निर्मिती च्या माध्यमातून छत्रपती राजे संभाजी शिक्षण शास्त्र महाविद्यालया च्या इमारतीची प्रतिकृती तयार करून त्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्रा.आर व्ही पाटील सर यांच्या हस्ते करून ती प्रतिकृती महाविद्यालयास भेट दिली. या कार्यक्रमाला प्रा. डॉ. जगदीश निमकर, प्रा. विजय भोई, सरिता येवले, गायत्री भंडारकर, सागर मोरे, योगेश खैरनार द्वितीय वर्ष विद्यार्थी शिक्षक दिनेश पाटील हितेश अत्तरदे, नेहा बडगुजर भाग्यश्री चांभार विद्या बाविस्कर पूजा माने आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील कर्मचारीवृंद तसेच द्वितीय वर्षातील विद्यार्थी-शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात झाली.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या