Friday, July 17, 2026
police dakshta logo
Homeक्राईमजळगावात बिश्नोई गँगच्या कथित संपर्काचे धागेदोरे; ८ ते १० तरुणांची दहशतवादविरोधी पथकाकडून...

जळगावात बिश्नोई गँगच्या कथित संपर्काचे धागेदोरे; ८ ते १० तरुणांची दहशतवादविरोधी पथकाकडून चौकशी

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील काही तरुणांचा कुख्यात गुन्हेगारी टोळीशी कथित संपर्क असल्याच्या प्राथमिक माहितीनंतर दहशतवादविरोधी यंत्रणांनी गुप्त तपास सुरू केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील विविध भागांतील सुमारे ८ ते १० तरुणांची चौकशी करण्यात आली असून, या कारवाईमुळे जिल्हाभरात मोठी चर्चा रंगली आहे.तपास यंत्रणांच्या प्राथमिक पडताळणीत संबंधित तरुणांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून परदेशात वास्तव्यास असलेल्या काही कुख्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींशी संपर्क आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.चौकशीदरम्यान त्यांच्या सोशल मीडिया खात्यांची सखोल तपासणी करण्यात आली. तसेच काही आर्थिक व्यवहार संशयास्पद वाटल्याने संबंधित बँक खात्यांचीदेखील पडताळणी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.या प्रकरणातील काही संशयित अल्पवयीन असल्याचेही समोर आले आहे.त्यामुळे तपास यंत्रणांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत संबंधित तरुणांची समुपदेशनाच्या माध्यमातून मानसिक जाणीव करून दिली.चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, भविष्यात अशा प्रकारच्या संपर्कापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.प्राथमिक तपासात काही तरुणांचा वापर करून स्थानिक पातळीवर गुन्हेगारी किंवा देशविघातक कारवायांसाठी जाळे उभे करण्याचा प्रयत्न झाला असावा, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही अंतिम पुष्टी करण्यात आलेली नाही. तपास सुरू असून सर्व बाबींची बारकाईने छाननी केली जात आहे.या घटनेमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची होणारी दिशाभूल, त्यांना गुन्हेगारी जाळ्यात ओढण्याचे वाढते प्रयत्न आणि पालकांनी मुलांच्या ऑनलाइन हालचालींकडे लक्ष ठेवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. तपास यंत्रणांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच महत्त्व देण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या