१८७,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त; आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता!
मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-मुक्ताईनगर पोलिसांनी घरफोडीच्या सलग चार गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत मध्यप्रदेशातील तिघा सराईत संशयितांना अटक केली आहे.आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ८७ हजार ५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईची माहिती ९ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोलिसांच्या प्रेसनोटद्वारे देण्यात आली.घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करताना मुक्ताईनगर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. या तपासादरम्यान मध्यप्रदेशातील तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले.पोलिसी चौकशीत आरोपींनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चार घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
आरोपींकडून सोन्याचे मंगळसूत्र, मंगळसूत्राच्या वाट्या, सोन्याची अंगठी, चांदीचे कडे, रोख रक्कम तसेच घरफोडीसाठी वापरण्यात येणारी साधने असा एकूण ₹८७ हजार ५०० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.जप्त केलेल्या मुद्देमालामुळे संबंधित गुन्ह्यांच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच तपास पथकाने केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून परिसरातील इतर घरफोडीच्या घटनांबाबतही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.