नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथे २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे कार्याध्यक्ष योगेशजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. ए. बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे महत्त्व आणि भारतीय संविधानाची माहिती दिली. तसेच श्री. आ. रो. चौधरी यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचा सविस्तर अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.संविधान दिनाचे औचित्य साधून शाळेत संविधानावर आधारित चित्रकला व मॉडेल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच संविधान सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता. या सेल्फी पॉइंटवर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सेल्फी घेत आनंद व्यक्त केला. तसेच संविधानावर आधारित गीतगायन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धाही घेण्यात आल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे. वाय. महाजन, श्रीमती एन. एम. चौधरी आणि यू. बी. भिलाला यांनी केले. चित्रकला स्पर्धेच्या आयोजनासाठी श्रीमती एस. एस. वासनिक आणि सौ. जी. एस. महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि लोकशाही मूल्यांची रुजवणूक व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

