यावल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- यावल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, बोरावलं गेट परिसरात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विश्ववंदनीय महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थितांच्या वतीने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (प्रस्तावनेचे) सामूहिक वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी मुख्याध्यापक सारंगधर अडकमोल, किशोर अंकल अडकमोल, डॉ. सागर चौधरी, यशवंत भाऊ अडकमोल, डॉ. विवेक अडकमोल, ॲड. रोहित इंदाटे, गिरीश सोनवणे, युवराज भाऊ भास्कर, योगेश अडकमोल, दीपक अडकमोल, नितेश अडकमोल, तुषार भास्कर, रोहित भालेराव, विक्रम अडकमोल यांच्यासह बोरावलं गेट परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त केला. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत संविधानाचा सन्मान राखण्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.

