Tuesday, June 30, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यावरणगाव पाणीपुरवठा योजनेत गैरव्यवहाराचा आरोप; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

वरणगाव पाणीपुरवठा योजनेत गैरव्यवहाराचा आरोप; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- वरणगाव नगरपरिषदेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेत आर्थिक अनियमितता, बनावट बँक गॅरंटी, संशयास्पद देयके आणि निकृष्ट दर्जाच्या कामांचा गंभीर आरोप समोर आला असून, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.याप्रकरणी तक्रारदार अजय अनिलकुमार जैन यांनी वरणगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे.या निवेदनात पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीत अनेक गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निवेदनानुसार, योजनेत बनावट बँक गॅरंटीचा वापर करून शासनाची दिशाभूल करण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच कोट्यवधी रुपयांच्या निधीचा गैरवापर झाल्याचीही शंका उपस्थित करण्यात आली आहे.कामांच्या गुणवत्तेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, पाईपलाईन, जलशुद्धीकरण केंद्र, जलसाठा टाक्या तसेच अन्य बांधकामांची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित प्रकल्पाची तृतीय पक्षामार्फत (थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट) चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.यासोबतच संपूर्ण प्रकल्पाचे विशेष लेखापरीक्षण (स्पेशल ऑडिट) करण्यात यावे, संबंधित कागदपत्रे जप्त करून तपास सुरू करावा, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतेही नवीन देयक अदा करू नये, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे वरणगाव शहरात मोठी खळबळ उडाली असून, पाणीपुरवठा योजनेतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या