संपादक चंदन पाटील मो. नं :- 9850168194
वरणगाव/उपसंपादक भुसावळ एकनाथ बोरोले/पोलीस दक्षता लाईव्ह:-दि.२४ शुक्रवार रोजी सायंकाळी येथील रामपेठ भागात राहणाऱ्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटना घडली आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे कि, रामपेठ परिसरात राहत असलेला तरुण नाव निलेश सुकलाल भोई वय (३५) हा रांगोळी विकण्याचा व्यवसाय करीत होता. गेल्या तीन वर्षापुर्वी त्याच्या पत्नीचे निधन झाले असून काही दिवसानंतर त्याच्या लहान भावाचेही निधन झाले होते.या कारणाने निलेश हा नेहमी नैराश्यात राहत होता. हे नैराश मनाला लावून त्याने त्याच्या राहत्या घरात पंख्याला दोरी बांधून गळाफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या बाबत मयत निलेश याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पो.हे.कॉ नावेद अली हे करीत आहेत.