Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमयावल: कुख्यात फरार आरोपी साहील शहा व त्याचा साथीदार अनस शहा अटकेत...

यावल: कुख्यात फरार आरोपी साहील शहा व त्याचा साथीदार अनस शहा अटकेत ; ३.४२ लाखांची रोकड हस्तगत.

यावल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- यावल पोलीस ठाणे हद्दीत दाखल जबरी चोरीचा गंभीर गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणत फरार असलेले कुख्यात गुन्हेगार साहील शहा सत्तार शहा (रा. धुळे) व अनस शहा अबुबकर शहा (रा. जळगाव) यांना अटक केली आहे. दोघांकडून गुन्ह्यातील ३ लाख ४२ हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले असून आतापर्यंत या गुन्ह्यातील एकूण १७ लाख ३६ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.यावल पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्र. ४७९/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४) – लूट जबरी चोरी, ३५१(३) – गुन्हेगारी धमकी व १२६(२) – अटकाव करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी स्थानिक गुन्हे शाखेस समांतर तपासाचे आदेश दिले होते.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेची चार पथके तयार करून भुसावळ, यावल, चोपडा व जळगाव शहरात रवाना करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या माहितीनुसार हा गुन्हा चोपडा व जळगाव शहरातील पाच आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी तीन आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.उर्वरित दोन फरार आरोपींच्या शोधासाठी तपास पथक धुळे जिल्ह्यात रवाना करण्यात आले. त्यानुसार मुख्य सूत्रधार साहील शहा सत्तार शहा हा त्याच्या राहत्या घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास धुळे–चोपडा रोडवरून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. तसेच अनस शहा अबुबकर शहा यास जळगाव परिसरातून अटक करण्यात आली.विशेष म्हणजे, साहील शहा हा धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत व अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी व चोरीचे २ गुन्हे, अंमली पदार्थ कायद्यान्वये १ गुन्हा तसेच वाहन चोरी व मंदिर चोरीचे ३ गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक अनिल बडगुजर व उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या पथकातील सोपान गोरे, विलेश सोनवणे, प्रितमकुमार पाटील, यशवंत टहाकळे, अक्रम शेख, सचिन घुगे, बबन पाटील, मयुर निकम, राहुल रगडे, प्रदीप सपकाळे, ईश्वर पाटील, गौरव पाटील व मिलिंद जाधव यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या