अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्याचे नवनियुक्त अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी आज आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला. यानिमित्ताने जिल्हा पोलीस दलात साध्या पण औपचारिक वातावरणात पदभार स्वीकृतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बदली झालेल्या अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नखाते यांना भावपूर्ण निरोप देत त्यांच्या कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त केली.नवीन जबाबदारी स्वीकारताना गावित यांनी कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच, नखाते यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
जळगाव पोलीस दलाकडून दोन्ही अधिकाऱ्यांना सन्मानपूर्वक मानाचा मुजरा करण्यात आला.

