नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील टोल नाक्यावर IMT टीमच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमात श्रीकांत बोढरे, तन्वीर पटेल, किरण पाटील, विनोद सपकाळे, रवींद्र सपकाळे, कैलास सपकाळे, लोकेश सपकाळे, योगेश शिरसाठ, सुनील गुंजाळ, सतीश बेलसरे, तुषार रंधे, निखिल नाथ, संतोष माळी, मंगेश, लखन पटेल, सचिन मराठे, प्रसन्न पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांनी सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला. प्रतिमापूजनानंतर सर्वांनी एकत्र येत अल्पोपहार व खीरचा आस्वाद घेतला. कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरणात महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.

