Thursday, April 16, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यायेवला येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी; विविध संघटनांकडून अभिवादन

येवला येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी; विविध संघटनांकडून अभिवादन

येवला | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- थोर समाजसुधारक, सत्यशोधक व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त येवला शहरात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहरातील क्रांतीसूर्य महात्मा फुले नाट्यगृह येथे सकाळी आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय हिंदू-मुस्लिम एकात्मता सोशल फाउंडेशन, लोकशाही मराठी पत्रकार संघ, स्वाभिमानी सेना, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळ व कौमे-खिदमत सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तसेच नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास अयाझ सैय्यद, अकीलबाबा शेख, राशीद समद शेख, अरबाज मोमीन, अकबर अन्सारी, नवनाथ आव्हाटे, समीरभाई सैय्यद, जनार्दन दरेकर, मयूर शेलार, जाकीरबाबा शेख, समीर पटेल, शंकर शेलार, पिरमोहम्मद शेख, प्रविण शेलार, शरीफभाई शेख, जाकीर अन्सारी, राजेंद्र गांगुर्डे, सलीम व अन्वर मुलतानी, हुसेन अन्सारी, महेश अदुकेत, संजय संत, प्रशांत वाघ, राजेंद्र संत, ओंकार शेलार, सोमनाथ रोकडे, संतोष गायकवाड, अभिषेक शेलार, कचरू जानराव, ओंकार जाधव, इमरानभाई मोमीन, ओम गायकवाड, पाशुभाई शेख, तुषार भालेराव, सिकंदर शेख, गणेश भालेराव, वाल्मिक सुरासे, लखन शेलार, दामू व राजेंद्र माळी, शब्बीरबाबा शेख, नवनाथ थोरात, शिवाजी सांबरे, रेहान मोमीन, सिद्धीक अन्सारी, मोबीन मुलतानी, आदम मोमीन, आश्रफ मोमीन, अल्ताफ पठाण आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान महात्मा फुले यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या