Saturday, April 18, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामहिलांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हानिहाय समुपदेशन केंद्रांची प्रभावी अंमलबजावणी

महिलांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हानिहाय समुपदेशन केंद्रांची प्रभावी अंमलबजावणी

नाशिक | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महिलांच्या तक्रारींचे जलद व परिणामकारक निवारण व्हावे यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून प्रत्येक जिल्ह्यात किमान तीन पोलीस ठाण्यांमध्ये समुपदेशन केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. या केंद्रांमुळे महिलांना तक्रार नोंदणी, आवश्यक मार्गदर्शन तसेच मानसिक आधार एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहे.सदर उपक्रमामुळे महिलांना वेगवेगळ्या कार्यालयांचे चकरा मारण्याची गरज उरणार नाही. तक्रार दाखल करण्यापासून ते त्यावर योग्य ती कार्यवाही होईपर्यंत सर्व प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. प्रशिक्षित समुपदेशकांच्या माध्यमातून महिलांना मानसिक आधार देण्यावर विशेष भर दिला जात आहे.

प्रशासनाच्या या निर्णयामुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत विश्वास वाढण्यास मदत होणार असून तक्रारींचे वेळेत निवारण होण्यासही गती मिळणार आहे. महिलांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही यंत्रणा अधिक प्रभावी ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या