Friday, April 24, 2026
police dakshta logo
Homeआरोग्यनशिराबादमध्ये उष्माघात नियंत्रणासाठी विशेष कक्ष सुरू

नशिराबादमध्ये उष्माघात नियंत्रणासाठी विशेष कक्ष सुरू

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत प्राथमिक आरोग्य केंद्र नाशिराबाद येथे ‘उष्माघात (Heat Stroke) कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

या विशेष कक्षामध्ये उष्माघातग्रस्त रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कक्षात थंड वातावरणाची व्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी, ओआरएस द्रावण, आवश्यक औषधे तसेच प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.उष्माघाताची लक्षणे दिसताच रुग्णांना विलंब न करता उपचार देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव जाधव व डॉ. अजयपाल सिंग यांनी नागरिकांना दुपारच्या कडक उन्हात अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे, डोक्याचे संरक्षण करावे आणि उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

दरम्यान, या उपक्रमामुळे नाशिराबाद व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, उन्हाळ्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या