Sunday, May 3, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबादमध्ये भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त कॅन्डल मार्च; उपासकांचा उत्स्फूर्त सहभाग

नशिराबादमध्ये भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त कॅन्डल मार्च; उपासकांचा उत्स्फूर्त सहभाग

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बौद्ध पंच मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा उत्सव कॅन्डल मार्चसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता बौद्ध धर्मगुरू भंतेजी अभिचित्त थेरो यांच्या हस्ते धम्म त्रिसूत्र पठण व धम्मपूजेद्वारे करण्यात आली. यानंतर धम्मध्वजाचे पूजन करण्यात आले. सकाळी सामूहिक भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते. बुद्धाचार्य तुषार रंधे यांनी उपस्थित उपासकांना मार्गदर्शन केले.

संध्याकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. पांढरे शुभ्र पोशाख परिधान केलेल्या उपासक-उपासिकांनी हातात जळत्या मेणबत्त्या घेऊन “बुद्धम् शरणम् गच्छामि”चा जयघोष करत व फुलांची उधळण करत मिरवणुकीत सहभाग नोंदविला. ही मिरवणूक भवानीनगर येथील तथागत गौतम बुद्ध विहारातून सुरू करण्यात आली.यावेळी भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण जयंती समितीचे अध्यक्ष अभय सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची सांगता मुक्तेश्वर नगर येथील विश्वशांती बुद्ध विहार येथे झाली. या प्रसंगी बौद्ध समाजाचे अध्यक्ष विनोद रंधे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश सावळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आनंदा रंधे यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या