Thursday, June 25, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनाशिराबादमध्ये श्री झिपरू अण्णा महाराज पुण्यतिथीनिमित्त नवनाथ भक्तिसार कथासोहळ्याचे आयोजन

नाशिराबादमध्ये श्री झिपरू अण्णा महाराज पुण्यतिथीनिमित्त नवनाथ भक्तिसार कथासोहळ्याचे आयोजन

४ ते ११ मे दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल; भाविकांना उपस्थितीचे आवाहन..

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील पूज्य श्री झिपरू अण्णा महाराज यांच्या ७७ व्या पुण्यतिथीनिमित्त अण्णा नगर, नाशिराबाद येथे भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, नवनाथ भक्तिसार कथासोहळा वैशाख वद्य ३ ते ११ (दि. ४ मे ते ११ मे २०२६) या कालावधीत संपन्न होणार आहे.सोमवार, दि. ४ मे रोजी सकाळी ९ वाजता ध्वजारोहणाने सोहळ्याची सुरुवात होणार असून, सायंकाळी ६ वाजता दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. दरम्यान, दररोज सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत अभिषेक पूजा होईल, तर सायंकाळी ७ ते १० या वेळेत नवनाथ भक्तिसार कथा आयोजित करण्यात आली आहे.या कथासोहळ्यात ह.भ.प. श्री गोपाल महाराज गारमोडे (लासुरा) हे कथानिरूपण करणार आहेत. कार्यक्रमात श्रीमद् भगवद्गीतेचे सामूहिक पारायण, संतचरित्र वाचन, भजन-कीर्तन तसेच सत्संग यांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, दि. १० मे रोजी सकाळी सत्यनारायण महापूजा पार पडणार असून, दुपारी गुरुदेव सिद्धपीठ गणेशपुरी येथील नामसंकीर्तन सत्संग होणार आहे. समारोप सोमवार, दि. ११ मे रोजी होणार असून, सकाळी ७ वाजता श्रींच्या पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर दुपारी १२ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या धार्मिक सोहळ्यात विविध मंदिरांच्या भजनी मंडळांचा सहभाग राहणार असून, परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री झिपरू अण्णा महाराज स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या