Saturday, May 2, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणकामगाराला मानाचा मुजरा; नशिराबाद नगरपरिषदेचा ध्वजारोहणाबाबत स्तुत्य निर्णय

कामगाराला मानाचा मुजरा; नशिराबाद नगरपरिषदेचा ध्वजारोहणाबाबत स्तुत्य निर्णय

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र दिनानिमित्त नशिराबाद नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आठवडे बाजार येथे सार्वजनिक ध्वजारोहण करण्यात आले. यावर्षी मात्र नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी एक प्रशंसनीय व वेगळा निर्णय घेत, कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या हस्ते ध्वजारोहण न करता कामगार दिनाचे औचित्य साधत नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील ज्येष्ठ कर्मचारी सुनील पाटील यांना सपत्नीक ध्वजारोहणाचा मान देण्यात आला.नगरपरिषदेच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले असून, कामगार बंधू-भगिनींनी याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.या ध्वजारोहण कार्यक्रमाला नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक-नगरसेविका तसेच मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या