भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- भारतामध्ये प्राथमिक आरोग्य सेवेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पिरामल स्वास्थ्य संस्थेतर्फे ‘सेहत ओके प्लिज’ या उपक्रमाअंतर्गत सुनसगाव येथे मंगळवार, ५ मे रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचारही देण्यात आले.पिरामल स्वास्थ्य संस्था देशभरात प्राथमिक आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्याचे कार्य करत असून, विशेषतः मधुमेह, रक्तदाब, हायपरटेंशन यांसारख्या असंसर्गजन्य आजारांवर लक्ष केंद्रित केले आहे. ‘सेहत ओके प्लिज’ या संकल्पनेतून गावागावांत जाऊन आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत.
धरणगाव, एरंडोल, यावल, जळगाव व भुसावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये ही सेवा सातत्याने दिली जात असून, सुनसगाव येथे गेल्या तीन-चार महिन्यांपासून दर महिन्याच्या ४ किंवा ५ तारखेला नियमित शिबिर घेण्यात येत आहे.प्रोजेक्ट समन्वयक प्रदीप रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एमएमयू-२ पथकातील जीएनएम रोशनी पेंदाम, एएनएम मंगल चौरे, सीएफओ नेहा खरतडे तसेच पायलट ज्ञानेश्वर सपकाळे यांनी शिबिर यशस्वीरीत्या पार पाडले.या उपक्रमाला सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र पाटील, विकासोचे चेअरमन सुजित पाटील, भोजराज कोळी, महेश भोळे, कमलाकर शिंदे, पत्रकार जितेंद्र काटे यांच्यासह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतली.

