Tuesday, May 5, 2026
police dakshta logo
Homeआरोग्यआयुष्मानच्या उपचारसंख्येत लक्षणीय वाढ.. ई-केवायसी प्रक्रिया सुलभ; नागरिकांना आयुष्मान कार्ड तातडीने तयार...

आयुष्मानच्या उपचारसंख्येत लक्षणीय वाढ.. ई-केवायसी प्रक्रिया सुलभ; नागरिकांना आयुष्मान कार्ड तातडीने तयार करण्याचे आवाहन

मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- ‘एकत्रित आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य’ योजनेचे कामकाज राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या ‘टीएमएस 2.0’ या प्रगत संगणक प्रणालीवर सुरू झाल्याने आरोग्य सेवेत वेग, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.ही आधुनिक प्रणाली रुग्णांच्या बायोमेट्रिक उपस्थितीची नोंद ठेवते, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे गैरप्रकार रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा कार्यरत आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने पार पडत असल्यामुळे उपचार प्रक्रियेत सुसूत्रता आली आहे.विशेष म्हणजे, ही प्रणाली लागू झाल्यानंतर उपचारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून ती १३५६ वरून थेट २३९९ पर्यंत पोहोचल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून आयुष्मान कार्ड मंजुरीसाठी लागणारा वेळ कमी व्हावा, यासाठी नागरिकांनी स्वतःचे आयुष्मान कार्ड तातडीने तयार करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आयुष्मान अॅप किंवा https://beneficiary.nha.gov.in/ या संकेतस्थळावरून लाभार्थी स्वतः कार्ड तयार करू शकतात. तसेच आशा सेविका, रेशन दुकानदार किंवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथेही ही सुविधा उपलब्ध आहे.रुग्णालयांना पुढील तीन दिवसांसाठी ई-केवायसीसह रुग्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा देण्यात आली आहे. या कालावधीत रुग्णांना उपचार नाकारल्यास किंवा पैशांची मागणी केल्याच्या तक्रारी आढळल्यास संबंधित आरोग्यमित्र, जिल्हा समन्वयक व प्रादेशिक व्यवस्थापकांनी तत्काळ हस्तक्षेप करून रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रत्येक रुग्णालयात नियुक्त आरोग्यमित्र व संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक योजनेच्या कक्षात दर्शविण्यात आले असून नागरिकांना तेथे संपर्क साधून मदत घेता येणार आहे. याशिवाय राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या support@jeevandayee.gov.in या ईमेलवर किंवा टोल फ्री १५५३८८, १८००२३३२२००, १४५५५१८००१११५६५ यावरही संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या