Monday, May 4, 2026
police dakshta logo
Homeआरोग्यनेवे वाणी समाज मंडळ पुणे स्नेहसंमेलनात महारक्तदान शिबिर; मान्यवरांचा गौरव

नेवे वाणी समाज मंडळ पुणे स्नेहसंमेलनात महारक्तदान शिबिर; मान्यवरांचा गौरव

पुणे | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नेवे वाणी समाज मंडळ, पुणे यांचे १६ वे स्नेहसंमेलन रविवारी (दि. ३ मे) येरवडा येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिरात उत्साहात पार पडले. विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित महारक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. स्व. सौ. श्वेता वाणी-नेवे फाऊंडेशन, जळगाव व नोबेल ब्लड सेंटर, हडपसर (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले.या उपक्रमासाठी अध्यक्ष मिलिंद नेवे, जनसंपर्क अधिकारी प्रविण जाधव, डॉ. संगिता व त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले.कार्यक्रमात वधू-वर परिचय मेळावा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच श्री शिवरत्न प्रतिष्ठान, जळगावतर्फे सादर करण्यात आलेल्या “मी येतोय” या शिवाजी महाराजांच्या विचारांवरील एकपात्री प्रयोगाने विशेष लक्ष वेधले. सामाजिक प्रबोधनाच्या अनुषंगाने स्त्रीरोग तज्ञ डॉ. वैशाली माळी यांनी महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघप्रार्थना घेऊन कार्यक्रमास विशेष स्वरूप प्राप्त झाले. नाशिक येथील किरण वसंत नेवे यांना ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साकळी येथील सेवानिवृत्त बँक अधिकारी राजेंद्र श्रीधर नेवे होते. यावेळी जळगाव येथील वंदना दिलीप वाणी, खामगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या भक्ती भूषण वाणी, इंदोरचे प्रशांत मधुकर वाणी, संभाजीनगर येथील लिपोट हेल्थ केअर प्रा. लि.चे संचालक जितेंद्र तात्याराव नेवे, जळगावचे उद्योजक धीरज प्रकाश दलाल तसेच धुळे येथील उद्योजक पंकज दिनकर नेवे आदी मान्यवर उपस्थित होते.अखिल भारतीय नेवे वाणी समाजातील परंपरा व संस्कृती जतन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

स्नेहसंमेलनाच्या यशस्वितेसाठी कार्यकारी समितीतील तुषार नेवे, किरण वाणी, दीपक नेवे, श्रीकांत नेवे, प्रसन्न व प्रमोद नेवे, मिलिंद वाणी, निलेश व महेश नेवे, तेजस्विनी, पूजा, अश्विनी व दीपिका नेवे यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या