नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील रेहमतपुरा भागात समर्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रभाग क्रमांक ८ मधील नगरसेविका नसरीन बानो शेख मुश्ताक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.शिबिरात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून विविध आजारांची तपासणी करण्यात आली. नागरिकांसाठी मोफत ईसीजी (ECG), रक्तदाब (BP) तपासणी तसेच आवश्यक औषधांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत असलेल्या आजारांच्या पार्श्वभूमीवर गरजू व सर्वसामान्य नागरिकांसाठी हा उपक्रम लाभदायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या शिबिरात डॉ. ए. जी. भंगाळे, सी.ए.ओ. प्रतीक सोनवणे तसेच डॉ. यशवंती मुंडे यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक सल्ला दिला. समाजातील दुर्बल घटकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना प्रत्यक्ष आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तर्फे करण्यात आल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. घराजवळच मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले.या उपक्रमासाठी सय्यद बरकत अली, गणेश नथ्थु चव्हाण आणि मुश्ताक ठेकेदार यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष सय्यद बरकत अली, शहराध्यक्ष गणेश चव्हाण, मुश्ताक ठेकेदार, नितीन महाजन, प्रवीण मिस्तरी, पीर मोहम्मद, जयेश पाटील, नईम भाई, रोहन महाजन, मुस्ताक भाई, शुभम भावसार, शुभम जाधव, दिलीप मराठे, दीपक कोळी, आरिफ टेलर, सलीम भाई, सय्यद सलीम, रफिक भाई, शकील खान, रहीम पहलवान, दीपक चव्हाण, देविदास काकडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे तसेच सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद आमोदकर यांनी शिबिरास भेट देत उपक्रमाचे कौतुक केले. या आरोग्य शिबिरात सुमारे ३०० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला असून भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

