नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील बायपास रोडवरील हॉटेल महाजन परिसरातील चहाची टपरी फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना पहाटे सुमारे १ वाजल्याच्या सुमारास घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी टपरीचे कुलूप तोडून आत प्रवेश करत टपरीमधील अंदाजे ४ हजार ४०० रुपयांचे साहित्य तसेच ५०० रुपये रोख रक्कम असा एकूण ४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून संबंधित फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी प्रशांत विरनारे हे करीत आहेत.

