Monday, May 25, 2026
police dakshta logo
Homeअपघातकोथळी-मुक्ताईनगर रस्त्यावर भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

कोथळी-मुक्ताईनगर रस्त्यावर भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- कोथळी ते मुक्ताईनगर रस्त्यावरील हॉटेल योगा योग समोर रविवारी (दि. 24 मे) सकाळी सुमारे 8:45 वाजता भीषण दुचाकी अपघात घडला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नामदेव प्रल्हाद भिल (रा. कोथळी, ता. मुक्ताईनगर) याने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल भरधाव आणि निष्काळजीपणे चालवत पवन नामदेव चौधरी यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात पवन नामदेव चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. तर आरोपी स्वतः आणि त्याचा मुलगा तेजस भिल हे गंभीर जखमी झाले आहेत.या घटनेनंतर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना संदिप वानखेडे करीत आहेत.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या